गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई : पाच गुन्हे उघड, एक लाख १६ हजार रुपयांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील हत्यारबंद टोळीला गुन्हे शाखा युनिट-३च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून पाच गुन्हे उघड करण्यात आले असून, एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजिम सलीम शेख (वय २२), हंसराज संजय परदेशी (वय २१), योगेश बाबा चौधरी (वय २५), अजय खंडू कदम (वय ३०), संतोष विष्णू अडसूळ (वय २२, सर्व रा. म्हसोबा मंदिराशेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट-३चे पथक गस्त घालीत होते. त्यावेळी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आजीम शेख व त्याचे साथीदार पंचतारा बिल्डिंगमधील मातोश्री ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असून, दांडेकर पुलाजवळ बसथांबा येथे थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिलाली. त्यानुसार युनिट-३च्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून एक लोखंडी कोयता, नायलॉनची दोरी, मिरची पूड, चाव्या, रोख ५०० रुपये, दोन दुचाक्या असा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींवर खडक, लष्कर, दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहायक पोलीस निरीक्षिका अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर, विल्सन डिसोझा, संजीव कळंबे, कल्पेश बनसोडे, सुजीत पवार, सोनम नेवसे, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.