येरवडा पोलिसांची कारवाई : कामावरून घरी जाताना कोयत्याने मारहाण करून केली होती लूटमार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कामावरून घरी जाणाऱ्या कामगाराला कोयत्याने वार करून मोबाईल व रोख २०हजार रुपये लूटून नेणाऱ्यांच्या येरवडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संगमवाडी-सादलबाबा चौकादरम्यान ४ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही व सूत्रांच्या माहितीआधारे १२ तासांत चोरट्यांना जेरबंद केले.
अभय ऊर्फ सनी रमेश पवार (वय १८), अण्णा ऊर्फ दीपक दत्ता पवार (वय २३), आसिफ सलीम शेख (वय २५), अंकुश संतोष पाटील (वय २४), राकेश देवीदास चौधरी (वय ३८), शुभम सुनील देशपांडे (वय २२), संदीप दत्ता हेडे (वय १८, रा. सर्व दिघी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी रात्री साडेबाराच्यासुमारास सायकलवरून संगमवाडी ते सादलबाबा चौकादरम्यान जात असताना दुचाकीवरील लुटणाऱ्या आरोपीचा सीसीटीव्ही व सूत्रांच्या माहितीआधारे पोलीस तपास करीत होते. आरोपींना दिघी येथून ताब्यात घेऊन तपास केला असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, सहायक पोलीस फौजदार प्रदीप सुर्वे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, पोलीस नाईक, अमजद शेख, पोलीस अंमलदार कैलास डुकरे, गणेश वाघ, तुषार खराडे, किरण घुटे, राहुल परदेशी, गणेश शिंदे, अजित वाघुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.