राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : वारजे परिसरातून 52 लाखांचा मद्यसाठा जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई करून एकाला अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून तब्बल 52 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कृष्णा तुळशीराम कांदे (वय-30 रा. मु. अंबील वडगाव, पोस्ट पोथरा, ता. बीड) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातून गोवा राज्यासाठी विक्रीचा परवाना असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारजे माळवाडी परिसरात एका आयशर (एमएच 09 एफएल 2948) वाहनावर छापा टाकला. या कारवाईत पथकाने वेगवेगळ्या कंपन्यांच्या मद्याचे बॉक्स जप्त केले आहे. पथकाने एकूण 450 बॉक्स, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 52 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, पुण्याचे अधीक्षक संतोष झगडे, बीडचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क (डी विभागातील) निरीक्षक संजय डेरे, निरीक्षक गणेश केंद्रे, दुय्यम निरीक्षक योगेंद्र लोळे, दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, स. दु. नि. व जवान समीर पडवळ, महेश बनसोडे, श्राजू पोटे, वाहन चालक अभिजित सीसोलेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.