पुणे व दिल्ली सायबर पोलिसांची कामगिरी : गुगल पे द्वारे पावती पाठवून फसवणूक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाईलद्वारे जास्त फी भरल्याचा बनावट स्क्रीनशॉट पाठवून जादा भरलेली फी परत करण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला. पुणे सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली. गुगल पे द्वारे हुबेहुब व बनावट पावतीने पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
स्टुडिओ आर्ट अँड ऑल नावाचे इन्स्टाग्राम यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे फेसबुक अकाऊंट असून, फिर्यादी फोक आर्टचे ऑनलाइन ट्रेनिंग व विद्यार्थ्यांची फीसुद्धा ऑनलाइन स्वीकारतात.
बजरंगलाल जगदीश नारायण मिना (रा. घर की कोठिया, पोस्ट घर,ता. बासी, जि. जयपूर, राजस्थान), राम लालराम मिना (रा. खरड, ता. अमेर, जि. जयपूर, राजस्थान), अनिलकुमार रामअवतार मिना, हरभजन दुंगाराम मिना (दोघे रा. दुधवाला, पो. जितवाला, पोलीस ठाणे कनोटा, जि. जयपूर, राजस्थान), मोहनकुमार रामजीलाल (रा. ता. लावण, जि. दोसा, राजस्थान) यांना ताब्यात घेऊन सायबर पोलीस पथक राजस्थानहून दिल्लीला रवाना झाले आहे.
आरोपी फिर्यादीला इन्स्टाग्राम अकाउंटवर मुसकानमीन३२ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रिक्वेस्ट पाठवून फोक आर्ट शिकायचे असून, फी व बाकी प्रोसिजर विचारून घेतली. त्यानंतर इन्स्टाग्राम चॅट बॉक्समध्ये मेसेज करून गुगल पे वर फीचे पैसे ट्रान्सफर केल्याचा मेसेज पाठविला. लागलीच त्याने पुन्हा मेसेज करून एक हजार ८०० रुपयांऐवजी अठरा हजार रुपये चुकून पाठविल असून, जास्त पाठविलेले सोळा हजार २०० रुपये दिलेल्या गुगल पे वर पाठविण्यास सांगितले. अकाउंटमध्ये अठरा हजार रुपये जमा झाले की नाही, हे पाहण्यासाठी अकाउंट चेक केले असता पैसे अकाउंटवर जमा झाले नव्हते. अशा प्रकारे फिर्यादीची फसवणूक झाल्याचे व त्यांनी अठरा हजार रुपये गुगल पेद्वारे बनावट पावतीने फसविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक करून दिल्ली येथील न्यायालयात ट्रान्झिट रिमांड घेण्याकामी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील पोलीस निरीक्षक चिंतामण व सहायक अंमलदार असे एक पोलीस पथकाने दिल्लीतील विशेष न्यायालयातून पाच दिवसांचा आरोपींना ट्रान्झिट रिमांड घेतला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक चिंतामण, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, पोलीस नाईक जाबा, पोलीस शिपाई हंडाळ, नागटिळक, पुंडलिक, लांडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
















