ट्रकचालक अटकेत : हडपसर-आकाशवाणीसमोर रविवारी घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सोलापूर रस्त्यावर हडपसर-आकाशवाणीसमोर भरधाव ट्रकची मोपेडला धडक बसून अपघात झाला. या अपघातात महिलेला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २९ नोव्हेंबर) साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
मंजिरी रमाकांत कपले (वय ५८, रा. मांजरी ग्रीन वूडस, मांजरी बु।।, ता. हवेली), जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव असून, रमाकांत दिनकर कपले (वय ६०, रा. मांजरी ग्रीन वूडस, मांजरी बु।।, ता. हवेली), जि. पुणे) असे जखमी झालेल्या नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक ज्ञानेश्वर बबन शेलार (वय २८, रा. चुंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) याला अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सोलापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्रासमोरून ट्रक घेऊन जात होते. त्यावेळी मोपेडला धडक बसल्याने मोपेडवरील दोघे जखमी झाले, तर महिलेला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गणेश क्षीरसागर करीत आहेत.


















