सीसीटीव्हीत उघड : कोथरुड, हडपसरमधील 4 सराफांना महिलेने घातला गंडा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर आणि कोथरुडमधील दोन सराफांच्या चार दुकानात खरेदीच्या बहाण्याने एका महिलेने सोन्यांच्या अंगठ्या नजर चुकवून चोरून नेल्या. विशेष म्हणजे या महिलेने दोन सराफांच्या कोथरुड आणि हडपसर येथील प्रत्येक दोन दुकानात ही चोरी केली असून, तिने चारही ठिकाणाहून सोन्याच्या अंगठ्यांची चोरी केली आहे.
कोथरुड व हडपसर येथील पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स आणि चंदूकाका सराफ या दोन सराफी दुकानात या चोर्या केल्या. हडपसर येथील दोन दुकानातून प्रत्येकी एक एक ग्रॅम सोन्याची अंगठी महिलेने हातचलाखी करुन चोरुन नेली. हडपसर येथील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स या दुकानातून ७.५ ग्रॅम वजनाची ३९ हजार ५७८ रुपयांची अंगठी, तसेच चंदुकाका सराफ अँड सन्स या मगरपट्टा येथील दुकानातून ९.५ ग्रॅमची ५१ हजार ६८५ रुपयांची सोन्याची अंगठी महिलेने हातचलाखी करुन चोरुन नेली. या चारही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. फुटेजवरुन या महिलेने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
