कात्रज चौक-नवले पुल दरम्यान झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव वेगातील कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना आंबेगाव बुद्रुक पीएमपी बस थांब्यासमोर कात्रज चौकाकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २३ डिसेंबर २०२१ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली होती. कंटेनरचालकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.
अमोल राजेंद्र खरात (वय ३२, रा. नांदेड सिटी, पुणे) असे अपघातात निधन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनरचालक इरफान शरगीर अहमद (वय ३२, रा. रामपूर, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार तुकाराम कदम यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी सांगितले की, कात्रज चौक- नवले पुल दरम्यान भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. कंटेनरचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता पळून गेला होता. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूरज कुतवळ पुढील तपास करीत आहेत.
