१५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले : १७ मोबाईल, चार दुचाकी वाहने जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ससून हॉस्पिटल, पुणे स्टेशन गाडीतळ चौक, येरवडा व पौड इत्यादी ठिकाणाहून आरोपीकडून १७ मोबाईल, चार दुचाकी जप्त केल्या.
पोलिसांनी सांगितले की, यश सुंदरलाल जैन (रा. विश्रांतवाडी, पुणे) ससून हॉस्पिटलजवळील आंबेडकर पुतळा येथे बसथांब्यावर ओला रिक्षाची वाट पाहात होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा तपास करीत सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी सर्किट हाऊसजवळ क्वीन्स गार्डन, रेल्वे पुलाखाली कोरेगाव पार्क येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन ससून हॉस्पिटल व पुणे स्टेशन परिसरातील चोरीस गेलेल्या मोबाईल व वाहनचोरीबाबत तपास केला. त्यावेळी आरोपीने १७ मोबाईल फोन व पुणे स्टेशन, गाडीतळ चौक, येरवडा व पौड इत्यादी ठिकाणाहून चार दुचाकी असा एकूण तीन लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
अपर पोलीस आयुक्त डहाळे, उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल पवार, पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव, विशाल माने, तपास पथकाचे पोलीस अंमलदार फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, संजय वणवे, सागर घोरपडे, किरण तळेकर व अंकुश खानसोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
