हडपसर पोलिसांत फिर्याद : मांजरी बुद्रुकमधील मोरेवस्तीमध्ये फोडले घर
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मांजरी बुद्रुक (मोरे वस्ती) येथील घराचे कुलूप तोडून एक लाख ८३ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी झाली. ही घटना ४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा अकरा ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.
संतोष म्हेत्रे (वय २९, रा. मांजरी बु।।, पुणे यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मोरे वस्ती (मांजरी बु्द्रुक, ता. हवेली, जि. पुणे) येथे फिर्यादीचे घर असून, चोरट्याने घराचा मुख्य दरवाजा आणि सेफ्टी
दरवाजाचे कुलूप तोडून एक लाख ८३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गाडेकर करीत आहेत.
