शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये ३०२, ३७६, ४०४, २९७, ५११ सेशन गुन्ह्यातील आरोपीला एम. एम. देशपांडे- जिल्हा व सत्र न्यायालयातील शिवाजीनगर यांनी ३०२ मध्ये जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व ३७६ मध्ये १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, ४०४मध्ये तीन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
आकाश नाथा कोळी (वय २९, रा. कोकाटे आळी, पूनम बेकरीजवळ, पाषाण, पुणे. मूळ गाव- मु.पो. देवापूर, ता. माण, जि. सातारा)) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे.
सरकारी वकील पुष्कर सप्रे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुभाष निकम व चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार के. आर. रेणुसे, पोलीस शिपाई पुकाळे, कोर्टातील सहायक पोलीस फौजदार कमलाकर गायकवाड यांनी या कामी उत्तम कामगिरी बजावली.















