येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : ६ जानेवारी रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बुंध्याकडील सहा चंदनाच्या झाडाचा भाग चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बॉम्बे इंजिनिअरिंग सेंटर परिसरामध्ये ६ जानेवारी २०२२ रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली.
मनजित सिंग (वय ४६, रा. संगमवाडी, येरवडा, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या बॉम्बे इंजिनिअरिंग सेंटर प्रतिबंधित परिसरातील सेंटर इन्स्ट्रक्टर वर्कशॉपच्या पाठीमागील झाडांमध्ये ४८ हजार रुपयांची बुंध्याकडील सहा चंदनाची झाडे अज्ञात चोरट्याने चोरून नेली. येरवडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके पुढील तपास करीत आहेत.

















