चंद्रकांत पाटील : पंतप्रधान मोदी यांच्या भावमुद्रेतील दिनदर्शिकेचे प्रकाशन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : नगरसेवक प्रवीण चोरबेले व माजी नगरसेविका मनीषा चोरबेले यांनी प्रत्येकाला उपयोगी पडेल आणि माहितीचा खजिना असलेली दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, सहकार परिषद राज्य मंत्री बाळासाहेब अनास्कर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेविका मानसी देशपांडे, मनोज देशपांडे व पर्वती मतदारसंघातील नगरसेवक-नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोरबेले यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावमुद्रेतील छायाचित्रांचा दिनदर्शिकेमध्ये खुबीने वापर केला आहे. तसेच, महत्वकांक्षी वेळापत्रक, विविध क्षेत्रातील मोबाईल क्रमांक अशा माहितीचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येकाच्या घर आणि कार्यालयामध्ये सर्वांच्या उपयोगी पडेल, अशी दिनदर्शिका असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
















