लोणीकाळभोर पोलिसांत फिर्याद : अंबड (जालना) येथून ऊसतोडणीस आलेल्या मुलीवर मावसाचा अतिप्रसंग
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ऊस तोडण्यासाठी आलेल्या कामगाराच्या एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावस भावाने दोन वेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरुळी कांचन येथील कॅनालच्या कडेला ऊसतोडी कामगारांच्या खोपीमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये घडली आहे.
याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मालेगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे राहणार्या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मुलगी ही आपल्या आई-वडिलांबरोबर ऊसतोडीसाठी उरळी कांचन येथे आली आहे.
उरुळी कांचन येथील कॅनालच्या कडेला पाल्यात ते राहतात.
ऑक्टोबर महिन्यात ही मुलगी खोपीमध्ये झोपली असताना तिच्या मावस भावाने तिला बाहेर बोलावून तिच्यावर दोन वेळा शारीरीक अत्याचार केले. ही बाब आता तिच्या आईवडिलांना समजल्याने फिर्याद देण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत.
