विश्रामबागवाडा पोलिसांत फिर्याद : हुजूरपागा बसथांब्यावरून पीएमपी बस रुट क्र.११ मध्ये घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठाच्या गळ्यातील एक लाख १० हजार रुपयांच्या सोनसाखळीवर चोरट्याने डल्ला मारला. पुण्यातील हुजूरपागा बसस्थानकावरून जाणाऱ्या पीएमपी बस मार्ग क्र.११ मध्ये २२ जानेवारी २०२२ रोजी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.
पिंपळे-गुरव येथील ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पिंपळे-गुरव येथे जाण्यासाठी हुजुरपागा बसथांब्यावरून पीएमपी बस मार्ग क्र.११ बसमध्ये बसले. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एक लाख १० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळीवर डल्ला मारला. विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मयूर भोसले पुढील तपास करीत आहेत.
