हडपसर पोलिसांत फिर्याद : सासवड रस्त्यावर विठ्ठल पेट्रोलपंपासमोर झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सासवड रस्त्यावर भेकारईनगर येथील विठ्ठल पेट्रोल पंपासमोर ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
अमेश अशोक मोरे (वय २८, रा. मोरेवस्ती, वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक अंकुश रामजी शेळके (वय २६, रा. मु.पो. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) याला अटक केली आहे. उमेश मोरे (वय ३३, रा. मोरेवस्ती, वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा भाऊ अमेश अशोक मोरे भेकराईनगर सासवड रस्त्याने वडकीनाल्याकडे जात असताना विठ्ठल पेट्रोलपंपासमोर ट्रकची पाठीमागून जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात अमेश मोरे यांचा मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षिका तृप्ती खळदे पुढील तपास करीत आहेत.
