हडपसर पोलिसांची कारवाई : १५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : काळेपडळ येथील ड्रीम्स नाईट हॉटेलवर छापा टाकून हुक्का चालविणाऱ्या दोघांना जेरबंद करून १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हडपसर पोलिसांनी २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई केली.
जयदीप रामचंद्र पवार (वय २८, रा. पवार आळी, जि.प.शाळेमागे, फुरसुंगी, पुणे), अमोल पांडुरंग शेलार (वय २९, रा. हिंद कॉलनी, ढमालवाडी, फुरसुंगी, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, हडपसर पोलीस काळेपडळ-संकेत विहार येथे गस्तीवर असताना ड्रीम्स नाईट हॉटेलमधून हुक्का पार्लरचा वास आला. पोलिसांनी तातडीने पंचांना बोलावून हुक्का पार्लर सुरू असल्याची खात्री केली. त्यावेळी हॉटेलमध्ये १४ पुरुष हुक्का ओढत असल्याचे आढळल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईदरम्यान १५ हजार २०० रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर व इतर साहित्य जप्त करून हुक्का पार्लर चालविणाऱ्या दोघांना अटक केले. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, अविनाश शिंदे, पोलीस नाईक प्रशांत भोसले, पोलीस शिपाई रियाज शेख, निखील पवार, प्रशांत दुधाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
