चंदननगर पोलिसांत फिर्याद : मुंढवा-खराडी बायपास रस्त्यावर गंगा अल्टस सोसायटीसमोर झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खराडी बायपास रस्त्यावरील दुभाजकातील झाडांना टँकरमधून पाणी घालत असताना पाठीमागून आलेली मोपेड टँकरला धडकून अपघात झाला. या अपघातात मोपेडचालकाचा मृत्यू झाला. मुंढवा-खराडी बायपास रस्त्यावर गंगा अल्टस सोसायटीसमोर २२ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.
जगदीश गोकलराम जाट (वय १९, रा. साईनाथनगर, वडगावशेरी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल थोरात (वय ३०, रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व टँकरचालक साईनाथनगर चौक-खराडी बायपास रोडवरील दुभाजकातील झाडांना पाणी सोडण्याचे काम करीत होते. त्यावेळी गंगा अल्टस सोसायटी येथे पाठीमागून मुंढव्याकडून मोपेड टँकरला धडकली. या अपघातात मोपेडवरील जगदीश जाट गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. चंदननगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणे पुढील तपास करीत आहेत.














