पोलिसांनी काही तासांत केली अटक : आळेफाटा येथील रानमळा येथे घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीच्या हत्येत शिक्षा भोगलेल्या आरोपी पतीने पुन्हा अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील आळेफाटा येथील रानमळा येथे घडली.
घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सगुना गोरख केदार (वय 40, रा. रानमळा) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, संतोष बबन मधे (वय 38, रा. रानमळा) असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी संतोष मधे याला पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने मृत सगुना गोरख केदार हिच्या सोबत अनैतिक संबंध निर्माण केले. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आरोपीने मृत सगुणासोबात राहण्यास सुरुवात केली. तिच्या सोबत राहत असतांना आरोपी संतोषने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर तिला दररोज दारू पिऊन मारहाणही करत होता.
दरम्यान, आरोपीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून मृत सगुनाने राहण्याचे ठिकाण बदलेले. परंतु, आरोपीने तिथेही जात तिला मारहाण केली. घटनेच्या दिवशी आरोपीने पहाटेच्या सुमारास सगुणावर धारदार शस्त्राने वार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर मृत सांगुणाचे वडील भाऊसाहेब रखमा दुधवडे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर आळेफाटा पोलिसांनी घटना स्थळावर दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, मृत महिलेसोबतचा वाद टोकाला गेल्याने तिची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर केली आहे.














