ह्युंडाई इओन कार जप्त : गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी पथक-२ची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई पासिंगच्या कारचा क्रमांक बदलून विक्री करणाऱ्या आरोपीला कोंढवा-लुल्लानगर येथे दरोडा व वाहनचोरी पथक-२ने अटक केली. आरोपीकडून ह्युडाई इओन दोन लाख ७५ हजार रुपयांची कार हस्त केली.
मोहम्मद कबीर उस्मान पुनावाला (वय ३०, रा. बी-शिदबा बिल्डिंग, बाळाराम इस्टेट, ग्रँट रोड, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे अधिकारी- कर्मचारी वानवडी व हडपसरमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी मुंबई पासिंगची ह्युडाई कार विक्रीसाठी लुल्लानगरमधील माऊंट कार्मेलजवळ थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचून आरोपीला कारसह ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतून मे २०१६ मध्ये त्याने कार चोरी केल्याचे सांगितले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी कोंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, सहायक फौजदार उदय काळभोर, पोलीस नाईक शिवानी जाधव, पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.