लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला पकडले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क
पुणे : हांडेवाडी येथे खून करून फरार झालेल्या आरोपीला ७२ तासांत लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सतीश मोहन चव्हाण (रा. हांडेवाडी ता. हवेली) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, हांडेवाडी परिसरातील करण रोहिदास हांडे (वय २१ रा. मारुती मंदिरासमोर, हांडेवाडी, ता. हवेली) याचा खून रविवारी (ता. २०) झाला होता. पोलिसांकडून सी.सी.टी.वी आणि सूत्रांच्या माहितीआधारे तपास सुरू होता. दरम्यान, खुनी बुधवारी (ता. २३) सतीश चव्हाण हा हांडेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीकडे करण हांडे याच्या खुनाची चौकशी केली असता त्याने हांडेवाडी येथील मोकळया जागेत कुऱ्हाडीने तसेच दगडाने वार करून खुन करून करण हांडे याची मयत बॉडी तेथेच जवळील मोकळ्या जागेत जमीनीत पुरल्याचे सांगितले. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर करीत आहेत.
हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले पोलीस नाईक, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिगंबर साळुंके, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.