महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : संयोगिता गाढवे महिला मंडळाच्या वतीने भूम येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शहरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शहरातील नगर परिषद समोरील प्रांगणामध्ये रविवारी (दि.८) हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सिनेतारका अश्विनी महांगडे यांच्यासह नगराध्यक्ष संयोगिता गाढवे, प्रेमा चोरमले, जान्हवी जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चना दराडे, डॉ. सई गाढवे यांची प्रमुख उपस्थिती लकी ड्रॉ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होती.
यावेळी आयोजित लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोपासेट पूजा सोमनाथ वारघडे, द्वितीय सोपासेट प्रतिभा शिंदे, तृतीय क्रमांकाचे राजाराणी कपाट पूनम कोडापे, चतुर्थ क्रमांकाचे एलईडी टीव्ही आशा चौधरी, पाचवे बक्षीस डायनिंग टेबल रेखा जावळे, सहावे बक्षीस मेकअप बॉक्स अनिता जाधव, सातवे बक्षीस कुलर रेणुका टेकाळे, आठवे बक्षीस टीपॉय सोनाली सोनटक्के, नववे बक्षीस तुळशी वृंदावन छाया नाईकवाडी, दहावे बक्षीस देवघर बानू शेख, अकरावे बक्षीस टेबल फॅन सारिका खोसे व बारावे बक्षीस गॅस शेगडी कोमल माळी यांना मिळाले.
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कोमल गाढवे, दैवशाला साबळे, प्रतीक्षा शेटे, नूतन सुर्वे, सुचिता नाईकवाडी, अर्चना साळुंखे, भारती माळी, निलोफर कुरेशी, भावना टिपे, रीमा शिंदे, भाग्यश्री माने, वैष्णवी अंधारे यांच्या वतीने ही बक्षीसे ठेवण्यात आली होती.

















