विश्रामबाग पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नारायण पेठ व कल्याणीनगर येथील राधा कॉटेज येथे सप्टेंबर २०२१ ते २४ मार्च २०२२ दरम्यान घडली.
सिद्धार्थ सुरेशकुमार शर्मा (वय १९, रा. इंद्रलोक सोसायटी, ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची १६ वर्षाची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही सिद्धार्थ शर्मा याने तिला जबरदस्तीने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरीक संबंध केले. ही बाब फिर्यादी यांना माहिती झाल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक शेडगे तपास करीत आहेत.
