रॅगिंग कमिटी, गुंडा स्कॉडची गस्त : २५० हून अधिक नागरिकांचा सहभाग
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ट्विटर लाईव्ह नागरिकांशी थेट संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केला. या कार्यक्रमामध्ये २५० हून अधिक नागरिकांनी प्रश्न विचारले, तर ४६९हून अधिक नागरिकांनी रिट्विट केले. नागरिकांनी पोलीस आयुक्तांना विविध विषयावर प्रश्न विचारले व त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले.
पुणेकरांनी वाहतूक समस्या, सायबर फसवणूक व महिलांविषयीच्या तक्रारी केल्या. त्यातील ३५ ते ४० प्रश्नांची उत्तरे पोलीस आयुक्तांनी स्वतः ट्वीट करून दिली.
पुणे शहरात शिकण्यासाठी आलेल्या परराज्यातील विद्यार्थ्यांना मुख्यतः विद्यार्थिनी व महिला यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची काय योजना आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महाविद्यालयीन स्तरावर रॅगिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून तसेच अँटी गुंडा स्कॉ़डतर्फे प्रत्येक परिसरामध्ये नियमित पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी १०९० या हेल्पलाईनवर महिला पोलिसांची तात्काळ सेवा उपलब्ध आहे. पोलीस आयुक्तांनी दिलखुलास उत्तर दिल्याने नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावेत, अशीही पुणेकरांनी विनंती केली.