• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

हुंड्याच्या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

March 16, 2026
0
19 4 25 1
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

लोणीकंदमधील घटना : आयटी इंजिनिअर पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : पुण्यात नोकरी करणाऱ्या आयटी इंजिनिअर मुलाचे स्थळ पाहून मुलीच्या वडिलांनी आपली जमीन विकून मुलीचे थाटामाटात लग्न लावून दिले. लग्नाअगोदर फर्निचरसाठी २ लाख रुपये दिले. लग्नानंतर कारसाठी ५ लाख रुपये दिले. असे असतानाही घराच्या इंटेरियरसाठी माहेरहून २० लाख रुपये आणावेत, यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने लग्नानंतर वर्षभराच्या आत गळफास घेऊन आत्महत्या केली. लोणीकंद पोलिसांनी आयटी इंजिनिअर पतीसह चौघांवर हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवी यशवंत लाटे (वय २२, रा. बकोरी रोड, लोणीकंद) असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई गंगाबाई अशोक जामकर (वय ४८, रा. बीड) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पती यशवंत शिवनाथ लाटे (वय २८), सासू सखुबाई शिवनाथ लाटे (वय ५०), सासरा शिवनाथ महादेव लाटे (वय ५५), दीर सुरज शिवनाथ लाटे (सर्व रा. गोकुळ पार्क फेज २, बकोरी रोड, लोणीकंद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत हा आयटी इंजिनिअर आहे. दोन्ही कुटुंबे बीडमधील रहिवासी आहेत. यशवंत आणि वैष्णवी यांचा विवाह ७ मे २०२५ रोजी बीड जिल्ह्यात झाला होता. लग्नापूर्वी जामकर कुटुंबीयांनी लाटे कुटुंबाला फर्निचरसाठी २ लाख रुपये दिले होते. त्यानंतर जमीन विकून वैष्णवीचे लग्न लावून दिले.

सासरी आल्यानंतर वैष्णवीचा छळ सुरू झाला. कारसाठी ५ लाख रुपये माहेरहून आण, अशी मागणी होऊ लागली. वैष्णवीची आई व मोठ्या बहिणीने ५ लाख रुपये लाटे कुटुंबाला दिले. त्यानंतर तरी सासरी वैष्णवीला चांगली वागणूक मिळेल, असे त्यांना वाटत होते.

काही दिवसांनंतर वैष्णवीचा पुन्हा छळ सुरू झाला. घराच्या इंटेरियरसाठी माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये, असे सांगून तिचा छळ सुरू झाला. पैसे आणले नाहीत तर मी दुसरे लग्न करेन, अशी यशवंत लाटे याने वैष्णवीला धमकी दिली. सासू-सासरे व दीरही तिला धमकावत होते.

या सर्व छळाला कंटाळून वैष्णवी हिने शनिवारी, १४ मार्च रोजी सकाळी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे तपास करीत आहेत.

March 20263

Latest Articles

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

March 16, 2026
अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन

अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन

March 16, 2026

भाग कर शादी – भाग्य की बर्बादी

March 16, 2026
प्रा. पल्लवी चौधरी यांना “वुमन फार्मासिस्ट ऑफ द इयर” पुरस्कार

प्रा. पल्लवी चौधरी यांना “वुमन फार्मासिस्ट ऑफ द इयर” पुरस्कार

March 16, 2026
स्व. भरतभाई शहा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

स्व. भरतभाई शहा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

March 14, 2026
Load More
Previous Post

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

March 16, 2026
अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन

अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन

March 16, 2026
प्रा. पल्लवी चौधरी यांना “वुमन फार्मासिस्ट ऑफ द इयर” पुरस्कार

प्रा. पल्लवी चौधरी यांना “वुमन फार्मासिस्ट ऑफ द इयर” पुरस्कार

March 16, 2026
Maharashtra Jain Warta Weekly 07 March To 13 March 2026

Maharashtra Jain Warta Weekly 07 March To 13 March 2026

March 14, 2026
लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेतील डमी उमेदवारांवर गुन्हा दाखल

लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेतील डमी उमेदवारांवर गुन्हा दाखल

March 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

March 16, 2026
अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन

अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन

March 16, 2026

भाग कर शादी – भाग्य की बर्बादी

March 16, 2026
प्रा. पल्लवी चौधरी यांना “वुमन फार्मासिस्ट ऑफ द इयर” पुरस्कार

प्रा. पल्लवी चौधरी यांना “वुमन फार्मासिस्ट ऑफ द इयर” पुरस्कार

March 16, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 14, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

March 16, 2026
अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन

अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन

March 16, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta