डॉ. राजेश शहा : कोल्हापूर गुजराती समाजातर्फे सभा व सत्कार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रात विखुरलेल्या गुजराती समाजाने एकत्र येऊन सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांनी आज येथे केले. महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कोल्हापूर गुजराती समाजातर्फे शाहूपुरीतील झोरबा हॉटेलमध्ये सभा झाली.
पारेख म्हणाले, “गुजराती समाजातील युवकांनी महामंडळाचे सदस्य होण्यासाठी पुढाकार घ्यावा. व्यवसायाच्या निमित्ताने समाजाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.” महामंडळातर्फे कोल्हापूरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.
यात ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा, गोपाल पटेल, जेठा पटेल, जसवंत शहा, तुलसीदास लिमडा, चंद्रकांत मेहता यांचा समावेश होता.
महामंडळाचे उपाध्यक्ष मुकेश मेहता, सचिव राजेश शहा, खजिनदार लखमशी शहा, कोल्हापूर गुजराती मित्र मंडळाचे अध्यक्ष जसवंत शहा, महेंद्र दलाल, प्रवीण पटेल, अशोक पटेल, विनोद पटेल, भूपेंद्र शहा, भालचंद्र पटेल, नीरज पटेल, गोपाल पटेल, नीलेश पटेल, रमण पटेल, अशोक शहा उपस्थित होते.
कोल्हापूरसह लातूर, सोलापूर, अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, सांगली, रायगड येथील गुजराती बांधवांनी सभेत सहभाग घेतला. निमेश वेद यांनी सूत्रसंचालन केले. नरेश पटेल यांनी आभार मानले.















