हडपसर पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळक्यास जेरबंद करण्यात हडपसर पोलीसांना यश आले आहे.
अनिकेत पाटोळे (वय २३ वर्ष) आदित्य पाटोळे (वय २१ वर्ष) लखन मोहीते (वय १९ वर्ष) तुषार मोहीते (वय १८ वर्ष) हसनील सेनेगो (वय १९ वर्ष) गौरव झाटे (वय १९ वर्ष) पंकज कांबळे (वय २१ वर्ष) ओंकार देडे (वय २० वर्ष) सर्व (रा. वैदुवाडी रामटेकडी हडपसर) यांना अटक व ५ विधिसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या परिसरात राहणारी मुले हातामध्ये लोखंडी शस्त्रे घेऊन आली. फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा विश्वास खिलारे याने अनिकेत पाटोळे, रवि पाटोळे, आदित्य पाटोळे व इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध खडक पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीचा राग त्यांनी मनात धरला होता. फिर्यादी यांना लोखंडी शस्त्राने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरासमोर पार्क केलेल्या मोटारसायकल व मोटार कारच्या काचा फोडल्या व इतर वस्तीमधील सात ते आठ गाड्यांचे नुकसान केले. तसेच बेकरी व प्रोव्हिजन स्टोअर्सच्या काउंटरच्या काचांची तोडफोड करुन त्यांचे नुकसान केले. आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवत कोणाला ही सोडु नका आडवा येईल त्याला मारा, कोणी मध्ये आल्यास त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यांच्यावर हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस स्टेशन, तपासपथक प्रभारी अधिकारी सहायक. पोलिस. निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक अविनाश शिंदे व स्टाफ यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन आरोपींना अटक केले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५ आर राजा यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, संदीप शिवले, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांच्या पथकाने केली आहे.
