शालेय पोषण आहारातून अंडी बंद करा: भाजपा जैन प्रकोष्ठचे आंदोलन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क- अभिजीत डुंगरवाल
पुणे: महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मध्यान भोजनमध्ये पौष्टिक आहार म्हणून अंडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या विरोधात पुणे येथे भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्वरित हा निर्णय बदलावा, पौष्टिक आहार द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना कडधान्य द्यावे. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र सरकारने त्वरित हा निर्णय रद्द करावा या हेतूने अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ व भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांचा नेतृत्वात राज्यभरात अंडा बंद आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी बोलताना संदीप भंडारी यांनी सांगितले की, आंदोलन अंतर्गत आपण मंत्री महोदयांच्या पत्त्यावर त्यांना कडधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व हया विषयाकडे त्यांचे लक्ष आकर्षित होऊन त्वरित त्यांनी निर्णय बदलावा या हेतूने त्यांना ५० ग्राम कडधान्याची पाकिटे राज्यभरातून पाठवीत आहोत.
पुणे येथुन 500 कडधान्याची पाकीट मंत्री दीपक केसरकर यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आले.
यावेळी भाजपा जैन प्रकोष्ठचे महेंद्र सुंदेचा, प्रकाश बाफना, प्रकाश बोरा, स्नेहील मेहता, निमेश शहा, तरुण मोदी, विनोद सोळंकी, ऋषिकेश शहा, रूपेश तलेसरा, नैना ओसवाल, मयुर सरनोत आदि शाकाहारी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
