भूम तालुका प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क- सुनील डुंगरवाल
भुम: कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नगर परिषद भूम व पोलीस स्टेशन भूम यांची नाहरकत घेऊन तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार भूम यांची बॅनर व पोस्टर्स लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. असा निर्णय तालुका प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
श्री. क्षेत्र अलंमप्रभु देवस्थान यात्रा दि.25 डिसेंबर ते 02 जानेवारी या कालावधीत साजरा होणाऱ्या यात्रा उत्सवात भूम शहरामध्ये भाविक भक्तांचे स्वागत करण्यासाठी मोठ मोठे अनाधिकृत बॅनर लावण्याची शक्यता आहे. त्याचा परीणाम वाहतुक व्यवस्था तसेच भाविकांना दर्शनासाठी जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच या कारणावरुन यापूर्वी विविध गटात वाद झाल्याचे उपस्थित शासकिय अधिकारी यांनी नमुद केले आहे.
वरील निर्णयाचे सर्व नागरिकांनी पालन करावे असे निर्देशित करण्यात येत आहे, बिना परवानगी बॅनर व पोस्टर्स लावले तर तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.
