हडपसर पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळीप्रमुख तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर त्याच्या ३ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. हडपसर पोलीसांनी ही कारवाई केली.
तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर,( वय २१ वर्ष रा. पापडेवस्ती), शुभम करांडे, (वय २२ वर्षे, रा. पापडेवस्ती, हडपसर) अथर्व शिंदे, (वय २१ वर्षे रा. साडेसतरा नळी, हडपसर) एक अनोळखी व्यक्ती यांना अटक करण्यात आलेली असुन इतर पाहिजे आरोपी आहेत.
फिर्यादी हे त्यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल पीएमटी बस डेपो शेजारी, ढमाळवाडी, भेकराईनगर या त्यांच्या हॉटेलमध्ये होते. तिथे तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर याने २०२१ मध्ये पापडे वस्ती येथे मर्डर केला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी पोलीसांना मदत केली असल्याचा राग मनात धरून त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन त्यांच्या हॉटेलमधील खुर्च्या, टेबल फेकुन देऊन हॉटेलमधील काउंटरची काच फोडली. त्यांच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवुन फिर्यादी यांच्या अंगावर धावुन आला. त्यांच्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच धारदार शस्त्रे हवेत फिरवुन मी आताच मर्डरमधुन बाहेर आलोय, जो कोणी माझ्याविरुध्द पोलीसांत तक्रार करेल त्याचा मी गेम करेन अशी धमकी दिली. म्हणुन त्याच्याविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. आरोपींनी दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व व दहशत रहावी म्हणुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्याकरीता केला आहे. हे तपासात निष्पन्न होत असल्याने त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. तसेच त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख, ह्या करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (मा. पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५ आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, संदिप शिवले, सारिका जगताप, पोलीस उप-निरीक्षक सुशिल डमरे, हडपसर निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोगें, यांनी कारवाई केली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही १०५ वी कारवाई आहे.
