चंदननगर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळीप्रमुख अतिश डिंगरे, व त्याच्या ५ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. चंदननगर पोलिसांनी ही कारवाई केली.
अतिश डिंगरे, (वय २३ वर्षे, रा. दिपक चौपाटी, जत्रा मैदानाचे जवळ, ता वणी जि यवतमाळ), स्वप्निल ओव्हाळ, (वय २२ वर्षे, रा. डुक्कर गल्ली जवळ, वडगावशेरी) कुणाल परिहार, (वय २० वर्षे, रा. गणेशनगर, वडगावशेरी) आकाश पायगुडे,(वय २२ वर्षे, रा. कलवड वस्ती, लोहगाव) अजय घनघाव, (वय २३ वर्षे, रा. धानोरी विश्रांतवाडी), आदित्य कांबळे, (वय २१ वर्षे, रा. वडगांवशेरी, भाजी मंडईजवळ) यांना अटक करण्यात आलेली आहे.
यातील फिर्यादी हे सत्यम सेरेनिटी सोसायटी, माळवाडी वडगाव शेरी पुणे येथे रात्रपाळी सिक्युरीटीची ड्युटी करीत होते. तेव्हा दोन मोटार सायकलवर ६ अनोळखी व्यक्ती अंदाजे वय २० ते २२ वर्ष सत्यम सेरेनिटी सोसायटी माळवाडी, वडगावशेरी पुणे येथे येऊन मोठ-मोठ्याने आरडा ओरडा करत होते. तेव्हा फिर्यादी यांनी तुम्ही सोसायटीच्या समोर का आरडा-ओरडा करत आहात. असे म्हणाले असता त्यावेळी त्यांनी तुला माहित नाही का, आम्ही वडगाव शेरीचे भाई आहोत. तु आम्हांला बोलतो का ? असे म्हणून त्यांनी फिर्यादी यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने केबीनच्या व सोसायटीचा साईन बोर्ड दगडाने फोडून हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरविले. तेथील रहिवासी यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण करून, आजूबाजूच्या परिसरातील रोडवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून अंदाजे ९५,५०० रुपये रक्कमेचे नुकसान केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान नमुद आरोपी अतिश डिंगरे व त्याचे इतर साथीदार यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.हे गुन्हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी सातत्याने चालु ठेवल्याचे निष्पन्न होत आहे. यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, शशिकांत बोराटे, यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील, पोलीस उप निरीक्षक दिलीप पालवे, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, पंकज मुसळे, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांनी केली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही १०६ वी कारवाई आहे.
