भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या बंटी बबलीचा पर्दाफाश करण्यात भारती विदयापीठ पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हा रोहन पाठक, (वय २० वर्षे, रा. नवीन बिल्डींग, स्वामी नारायण मंदीराच्या मागे नऱ्हेगाव) याने त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने केला आहे.
त्याच्याकडुन चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. तसेच ९५,००० रुपयांची २ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाहन चोरांचा शोध घेत होते. तेव्हा पोलीस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांना स्वामी नारायण मंदीर येथे एक व्यक्ती चोरीची गाडी घेऊन थांबला आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुशंगाने तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वामी नारायण मंदीर येथे जाऊन तेथे सापळा रचला व आरोपी त्याच्या ताब्यातील स्प्लेंन्डर दुचाकी गाडीसह मिळुन आला.
अटक आरोपीकडे अधिक तपास करता त्याने व त्याच्या मैत्रिणीने मिळुन कात्रज भागातील दुचाकी गाडया चोरी केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण कुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०२ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, सचिन सरपाले, बापु भिंगारे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
