वाजतगाजत काढली मिरवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : तालुक्यातील सावरगांव (द) येथे श्री दत्त व नवनाथांच्या मूर्तीची टाळ मृदुंग, ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली.
येथील रामा शंकर बोराडे व त्यांच्या पत्नी आलका रामा बोराडे यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये श्री दत्त व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ या नऊ नाथांच्या सुबक मूर्तींची विधिवत होमहवन पुजा करून भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली.
यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
