सायबर पोलीसांनी आरोपीस केले जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन त्याद्वारे अधिक नफा मिळवुण देण्याचे अमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. सायबर पोलीसांनी ही कामगिरी केली आहे.
गणेश सागर, ( वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं. ए-१०४, पहिला मजला, एस.बी. युथ, सीजीएचएस, प्लॉट नं. ६ बी, सेक्टर २, फेज १, द्वारका, गव्हमेंट स्कुल शेजारी, नवी दिल्ली) याला दिल्ली येथून तर प्रशांत कुमार कमलेश भाई ब्रम्हभट,( वय ३४ वर्षे, सध्या रा. ४०४, अॅन्डालुस प्लाझा, मंखुल, बुर दुबई, कायमचा पत्ता- हाऊस नं. २२/२११, मारुती धाम, जीआयडीसी, मकरपुरा, वडोदरा, गुजरात) यास आर्थिक गुन्हे शाखा, सुरत शहर, गुजरात याला मध्यवर्ती कारागृह, लाजपोर, सुरत, गुजरात येथुन अटक करण्यात आली आहे.
सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील आरोपींनी वेळोवेळी वेग-वेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या सेमिनार मध्ये फिर्यादी यांना तसेच इतर गुंतवणुकदारांना जादा परतावा देण्याच्या बहाण्याने बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये तसेच मल्टीलेव्हल मार्केटिंगसारख्या प्लॅनमध्ये गुंतवणुक करावयास सांगितले. आरोपींनी चालू केलेले प्लॅटफॉर्म, प्लॅन्स्, वेबसाईट, पोर्टल हे जाणीवपूर्वक फसवणूक करण्याच्या उद्देशाने कालांतराने बंद करुन फिर्यादी तसेच त्यांचे इतर ०७ सहकारी गुंतवणुकदार यांना गुंतवणुक केलेल्या रकमेवर कोणताही परतावा न देता त्यांची एकुण रक्कम ८४,३४,६४१.७६ रुपये किमतीची आर्थिक फसवणूक केली. म्हणुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीला ताब्यात घेतले असुन त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आलेले आहे. बिटसोलाईव्हज प्रा.लि. कंपनी, दुबई यामधील डायरेक्टर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या सेमिनार मध्ये बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये तसेच मल्टीलेव्हल मार्केटिंगसारख्या प्लॅनमध्ये गुंतवणुक करावयास सांगुन आरोपींनी चालू केलेले प्लॅटफॉर्म, प्लॅन्स्, वेबसाईट, पोर्टल हे जाणीवपुर्वक फसवणूक करण्याच्या उद्देशाने कालांतराने बंद केले. फिर्यादी तसेच त्यांच्या इतर ७ सहकारी गुंतवणुकदारांची मोठ्या रकमेची फसवणुक केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर सावंत हे करीत आहेत.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की, बक्सकॉईन या क्रिप्टोकरन्सी या कंपीनीच्या नावाचा वापर करून गुंतवणुक करण्याचे सांगुन कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेशी संपर्क करावा.
ही कारवाई पोलीस आयुक्त, रितेश कुमार,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे आर.एन. राजे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे- पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, प्रमोद खरात, संदेश कर्णे, पोलीस अंमलदार राजेश केदारी, अश्विन कुमकर, प्रविणसिंग राजपुत, वैभव माने, दिनेश मरकड, शिरीष गावडे, निखील पासलकर सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.