येरवडा पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: टोळी प्रमुख जुनेद शेख व त्याच्या ४ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. येरवडा पोलीसांनी ही कारवाई केली.
जुनेद शेख, (वय-२३ वर्षे, रा. स.नं. १२, पवार चाळ, लक्ष्मीनगर, येरवडा) अविनाश उर्फ सुक्या शिंदे, (वय २१ वर्षे, रा. येरवडा), मंगेश ऊर्फ घुल्या काळोखे, (वय १९ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. निखील ऊर्फ बॉडी शिंदे, (वय २३ वर्षे, रा.स.नं.१२, लक्ष्मीनगर, येरवडा) व एक साथीदार हे पाहिजे आरोपी आहेत.
यातील फिर्यादी हे त्यांच्या भावासह लक्ष्मीनगर येरवडा येथे बोलत होते. यातील जुनेद शेख, अविनाश ऊर्फ सुक्या शिंदे, मंगेश ऊर्फ घुल्या काळोखे, निखील ऊर्फ बॉडी शिंदे व त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर अनोळखी साथीदार यांनी हैद्राबाद हॉटेलच्या बाजुने हातातील लोखंडी धारधार हत्यारे व दगड घेऊन येऊन ते हवेत फिरवून शिवीगाळ केली. कोई आगे आयेगा, तो नहिं छोडेंगे, अपने अपने घर जाओ असे फिर्यादी व त्यांच्या भाऊ तसेच नागीरकांना धमकावुन सांगितले. त्यांच्यावर दगडफेक करुन, फिर्यादी व त्यांचे भाऊ यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.तसेच त्यांच्या हातातील धारधार हत्यारे व दगडांनी फिर्यादीं तसेच परिसरातील इतर २७ वाहनांच्या काचा फोडुन दहशत निर्माण केली.आरोपी जुनेद शेख याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्याने इतर टोळी सदस्य यांच्यासह येरवडा परीसरात दहशत निर्माण करून, स्वतःसाठी व इतरांसाठी आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने तसेच परिसरात त्यांच्या टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला. नागरीकांच्या मनात भिती निर्माण करुन, त्यांनी अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेवली. संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन टोळीने दरोडा घालणे, सदोष मुनष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगा करणे, प्राणघातक हत्यारे सतत जवळ बाळगणे, दुखापत किंवा हमला करण्याची पुर्वतयारी करणे, गृह-अतिक्रमण करणे, निरपराध व्यक्तीस अटकाव करुन अन्यायाची कैद करणे, दहशत माजवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, आगळीक करुन रोजंदारीवर उदरनिर्वाह असलेल्यांच्या वाहनांच्या काचा फोडुन नुकसान करणे, दिवसा व रात्रीचे वेळी घरफोडी करणे तसेच आजु- बाजुच्या परिसरातील गरीब, असहाय्य युवकांना जमवुन त्यांना पैशाचे व इतर प्रकारचे अमिष दाखविले.
त्यांना वेग-वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांचे साथीदार बनवुन,त्यांच्याकरवी गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
गुन्ह्याचापुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, संजय पाटील हे करीत आहेत.ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०४, शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक, कांचन जाधव, जयदिप गायकवाड, निगराणी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, महेश लामखडे, पोलीस अंमलदार, सचिन माळी, सचिन शिंदे, देविदास वांढरे यांनी केली आहे. मोक्का अंतर्गत केलेली ही १११ वी कारवाई आहे.
