जीतो पुणेच्या वतीने सत्कार समारंभ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: कोलकाता येथे जितो ट्वेंटी-ट्वेंटी लेडीज प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आर.ओ.एम झोनच्या संघाने विजय मिळविला. या आरओएम झोनच्या संघात पुण्याच्या 8, पिंपरी चिंचवडमधील 3 तर छत्रपती संभाजीनगरमधील एका खेळाडूचा समावेश होता.
सिध्दी ग्रुपच्या वतीने हॉलिडे पॅकेज – या विजेत्या खेळाडूंना जितो पुणेचे उपाध्यक्ष मनोज छाजेड यांच्या कडून रोख 21 हजार रुपये तसेच मुळशी येथील सर्व सुविधायुक्त असलेले फाईव्ह स्टार रिसॉर्ट सरेनो फार्म येथे एक दिवस सर्व टीम व त्यांचे सहकारी यांना एक दिवसाचे हॉलिडे पॅकेज देण्यात आले आहे.
या स्पर्धेत आरओएम झोनच्या संघाने चमकदार कामगिरी करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले शिवाय 1 लाख 20 हजार रुपयांचे बक्षीसही आपल्या नावे केले. यावेळी आरओएम संघाचे नेतृत्व मयुरी शिंगवी हिने केले होते, तर उपकर्णधार पदाची जबाबदारी रुपल बाफना हिच्या खांद्यावर होती. यावेळी संघाचे प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र मंडळाचे क्रिकेट प्रशिक्षक अश्विन पराटे यांनी जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेत मालिकावीर होण्याचा मान नताशा शहा हिने पटकावला तर आर.ओ.एम संघाने 17 बक्षिस पटकावली. यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, वुमन ऑफ द सीरीज अशा विविध श्रेणींमधील चमकदार कामगिरींचा समावेश होता. आरओएम झोनच्या खेळाडूंनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जीतो कार्यालय पुणे विभागातर्फे त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात सर्वांचे स्वागत करण्यात आले. आरओएम पुणेच्या महिला संयोजक वैशाली छाजेड व लेडीज चेअरपर्सन लकीशा मर्लेचा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रमण आरोग्यम जितो ऍपेक्सचे उपाध्यक्ष विजय भंडारी, आरओएमचे चेअरमन अजित सेठिया, जीतो पूनेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, जितो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, आरओएमचे उपाध्यक्ष मनोज छाजेड, खजिनदार किशोर ओसवाल, उपाध्यक्ष पंकज कर्नावट, जे एल डब्लू ऍपेक्सच्या संयोजक प्रियांका परमार, आरओएम सी एफ ई च्या संयोजक खुशाली चोरडिया, आरओएमच्या विवाह संयोजक पूनम ओसवाल, आरओएमचे युवा संयोजक गौरव नहार, पिंपरी चिंचवड जे एल डब्लू ऍपेक्सच्या चेअरपर्सन वैशाली बाफना, जे एल डब्लू पुणेच्या मुख्य सचिव मोना लोढा, सहसचिव नयना खिवंसरा, खजिनदार रिटा जैन, क्रीडा संचालक रेखा कंगतानी तसेच बीओडी सदस्य वंदना राठोड व स्नेहल चोरडिया व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
