मकर संक्रांती निमित्त डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते प्रदान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : मकरसंक्रांती निमित्त बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रामा सेंटरला ह.भ.प. श्रीगुरु डॉ जयवंत महाराज बोधले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शैलजा ताई पाटील यांच्याकडून हॉस्पिटलमधील ट्रॉमा सेंटरसाठी 1 लाख रुपयांची देणगी ह.भ.प.श्रीगुरू डॉ जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते देण्यात आली.
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, बापूसाहेब शितोळे, पी टी पाटील, हॉस्पिटलचे मुख्य अधीक्षक डॉ. जगताप, हृदयरोग तज्ञ डॉ आदित्य साखरे तसेच प्रा विलास जगदाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह. भ. प. श्रीगुरू जयवंत महाराज बोधले यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर श्री गुरुचे आशीर्वचन संपन्न झाले.
