बार्शी पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तगत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भगवंत मंदिर परीसरात गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या महीलांना बार्शी शहर पोलीसांनी तात्काळ अटक केली. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
महाद्वार चौकातील कमानीजवळ, बार्शी येथे अज्ञात चोरटयांनी फिर्यादी नामे ख्याली सोमनाथ ढवळे, वय ४१ वर्षे, व्यवसाय घरकाम, जात हिंदू शिंपी, रा. मंगळवार पेठ, उत्तरेश्वर मंदिर शेजारी, बार्शी, ता. बार्शी याचे पर्समधील ३०,०००/- किंमतीचे एकूण ०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे काळे मण्यातील गंठन त्यात ०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक व ०३ ग्रॅम वजनाचे सोन्यावे जोधळ मणी असलेले तसेच पाण्याच्या टाकीजवळ, सुभाषनगर बार्शी यांचा ३०००/-रु किमतीचा सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, नितल अतुल माने, राढोबरे गिरणीजवळ, उपळाई रोड, बार्शी यांचा ४०००/-रु किंमतीचा रेड मी प्राईम कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, अनिता मारुती माने, रा. कथले प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल जवळ, आगळ्गाव रोड बार्शी यांचे रोख स्वकम १७००/-रु कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुददाम, लबाडीने, फिर्यादीचे परवानगीशिवाय चोरून घेवुन गेल्या आहेत म्हणून फिर्यादीने त्यांच्या विरुध्द तकार दिली.
तपासा दरम्यान गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तीन महिला सदर चोरी करून बार्शी एस. टी. स्टॅन्ड बाहेर जाणाऱ्या गेटवे आडोशाला लपुन बसलेले आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन पाहणी व चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन सदर गुन्हयात चोरून घेवुन गेलेला मुददेमाल मिळुन आला. अश्विनी बाबा शिंदे, वय ५ वर्षे, चंदाबाई उत्तम शिंदे, वय ४३ वर्षे, अक्काबाई भावडया शिंदे, वय ५० वर्षे सर्व रा. भोकनवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३८७००/-रु किंमतीचा सर्व मुददेमाल तात्काळ हस्तगत करून सदर गुन्हयात जप्त करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास बाळकृष्ण दबड़े हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे साो, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी साते यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोहेकों / रियाज शेख, शैलेश चौगुले, पोना / ११६२ मनिष पवार, पोकों/ सविन नितनाथ, सचिन देशमुख, रोहीत बागल, अंकुश जाधव, शरद वाघमोडे, प्रल्हाद अकुलवार, अविनाश पवार, राहूल उदार, धनराज फत्तेपुरे, मोहन कदम, सचिन अंकुश सायबर पोलीस ठाणेचे पोकों/ स्तन जाधव यांनी केली आहे. करीत आहेत.
