फरासखाना पोलिसांनी शिताफिने पकडले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सोन्याच्या दुकानातील चोरी करणा-या कामगार व त्याच्या साथीदाराना २४ तासात फरासखाना पोलीस स्टेशनकडुन अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी सुनिल कोकरे व त्याचे साथीदार अनिल गारळे व तानाजी खांडेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच सुनिल कोकरे यांची आई राजश्री कोकरे, भाऊ अनिल कोकरे, नवनाथ कोकरे यांनी संगणमत करुन मुद्देमाल लपवुन ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडुन एकुण ३ किलो ४८० ग्रॅम ५ मिलीग्रॅम सोने व ९,७३,०७०/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहेत. फिर्यादी दिपक माने यांचे ७९७ रविवार पेठ पुणे येथील राज कास्टींग नावाचे दुकान कुलूप लावुन बंद होते. त्यांच्या दुकानामध्ये सध्या कामासाठी असलेले कामगार किंवा पुर्वी काम करत असलेल्या कामगारांपैकी कोणीतरी फिर्यादी यांच्या दुकानाची व तिजोरीची बनावट चावी बनवून त्या चावीने दरवाजा उघडून दुकानामध्ये प्रवेश केला. दुकानामधील लोखंडी तिजोरी बनावट चावीने उघडून त्यामध्ये ठेवलेले एकुण ३,३२,०९,२२८ किमतीचे ५ किलो ३२३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व १०,९३,२६० रुपये रोख रक्कम फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरुन नेली.
दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये फिर्यादीच्या दुकानातील कामगार सुनिल कोकरे हा त्याची आजी वारल्याचे सांगुन त्याच्या गावाकडे दोन दिवसा पूर्वी गेल्याचे समजले होते. परंतु तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न झाले की, हा कामगार हा दोन दिवसांपासुन पुणे मध्ये असल्याचे व घटनेच्या वेळी घटनास्थळावर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी सुनिल कोकरे याच्या सोबत पुणे येथे राहणारा त्याचा मित्र अनिल गारळे हा सध्या पुणे सोडुन बाहेर गावी गेल्याचे समजले. या माहितीच्या अनुषांगाने लागलीच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व स्टाफ असे जत सांगली येथे तपासाकरता रवाना झाले. या पथकाने यातील मुख्य आरोपी सुनिल कोकरे व त्याचा साथीदार सिध्देश्वर ऊर्फ तानाजी खांडेकर याला त्याच्या घरी कारंडेवाडी, ता-जत, जि-सांगली येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हयाबाबत तपास केला. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही चोरी त्याचे साथीदार अनिल गारळे व तानाजी खांडेकर यांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले. परंतु गुन्हयातील मुद्देमाल हा त्यांचा दुसरा साथीदार अनिल गारळे याच्याकडे असल्याचे सांगुन तो सध्या कोल्हापुर येथे असल्याचे सांगितले. त्यावेळी फरासखाना पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार गणेश दळवी व प्रमोद मोहीते यांनी या आरोपींना ताब्यात घेऊन कोल्हापुर येथे घेऊन गेले असता तेथे गुन्हे शाखा युनिट १, पुणे शहर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर व स्टाफ यांनी यातील आरोपी अनिल गारळे याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन्ही पथकानी ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींकडे विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी चोरलेला मुद्देमाल हा सुनिल कोकरे याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे या आरोपींना घेऊन दोन्ही पथके सुनिल कोकरे याच्या घरी कारंडेवाडी, ता-जत, जि-सांगली येथे आले असता आरोपी सुनिल कोकरे याने चोरी केलेले सोने व रोख रक्कम घरा जवळील शेतातील हत्ती घासमध्ये लपवले असल्याचे सांगितले. तेथे पोलीसांनी आरोपीच्या शेतामधुन २ किलो ९८३ ग्रॅम ५ मिलीग्रॅम सोने व ७,७३,०७० रुपये रोख रक्कम जप्त केली.
आरोपींना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली. अटक आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन त्यांच्याकडे उर्वरीत सोने व रोख रक्कम बाबत तपास करता ते काहिएक उपयुक्त माहिती देत नसल्याने फरासखाना पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार प्रमोद मोहीते, मल्लीकार्जुन स्वामी, संदीप कांबळे यांनी आरोपी सुनिल खंडु कोकरे याच्या मुळ गावी जाऊन त्याच्या घराची व शेताची झडती घेतली असता या झडतीमध्ये ४९७ ग्रॅम सोने व १,५०,०००/- रुपये रोख रक्कम शेतामध्ये लपवुन ठेवल्याचे मिळुन आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत. हा मुद्देमाल हा आरोपी सुनिल कोकरे यांची आई राजश्री खंडु कोकरे, भाऊ अनिल खंडु कोकरे, नवनाथ खंडु कोकरे यांनी संगणमत करुन लपवुन ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात वाढ करुन राजश्री कोकरे, अनिल कोकरे, नवनाथ कोकरे यांना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गुन्हयातील उर्वरीत सोने व रोख रक्कमेबाबत काहिएक उपयुक्त माहिती देत नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार प्रमोद मोहीते, वैभव स्वामी, प्रविण पासलकर, निर्मला शिंदे यांनी आरोपींना घेऊन त्यांच्या मुळ गावी जावुन बी.डी.डी.एस सांगली ग्रामीण व श्वान पथक सांगली ग्रामीण, डी.एस.एम.डी च्या मदतीने आरोपीच्या घराची व घरा लगतच्या शेतात शोध घेतला असता शेतातील एका पीव्हीसी पाईप मध्ये आरोपीने रोख रक्कम ५०,००० रुपये लपवुन ठेवलेली मिळुन आल्याने ती जप्त करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन वैभव गायकवाड हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहायक पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट १ शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी, निर्मला शिंदे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, किशोर शिंदे, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजित शिंदे, शशीकांत ननावरे, राहुल मखरे, अजय थोरात, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अर्जुन कुडाळकर यांच्या पथकाने केली आहे.