युनिट ४ ने घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्याला युनिट ४ ने ताब्यात घेतले आहे.
अंतेश्वर उर्फ अंतू स्वामी (वय 21 वर्षे, राहणार- गिरनार हाइट्स फ्लॅट नंबर ३०१ जाधव नगर भाग 2, गुजरवाडी फाटा कात्रज) असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एकूण ७३,००० रुपये किमतीचे ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असतान युनिट ४ चे पोलीस हवालदार सारस साळवी व पोलिस हवालदार हरीश मोरे यांना माहिती मिळाली की, रेंजहिल्स खडकी येथील एच टाईप बिल्डिंग समोर अंतू स्वामी हा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कमी किमतीत मोबाईल विकत आहे. लागलीच युनिट ४ कडील पथकाने या ठिकाणी जाऊन संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने ४ मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. गुन्हा उघडकीस आणून आरोपी याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी चतु:र्श्रुंगी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात मुद्देमालासह देण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ४ चे सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली API विकास जाधव, PSI जयदीप पाटील, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, अमोल वाडकर यांनी केली आहे.