एम एफ सी एल स्पर्धेतील यशस्वी कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात झेड.एम.एल रायडर्सने आर. एस. जी रायझर्स चा १४ धावांनी पराभव करत एम एफ सी एलच्या तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.
12, 13 आणि 14 जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत 16 संघांद्वारे तब्बल 208 युवा व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. देवांश नहार यास सर्वोत्तम फलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा तर निलेश चौधरी यांस सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला. सुशांति अँड कंपनी यांच्या हस्ते विजयी संघास चषक आणि एक लाख रुपयांचे तर उपविजेत्या संघास बोगावत अँड सन्स यांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेच्या तीन दिवसांदरम्यान महिला आणि लहान मुलांसाठी झुंबा, केक बनवणे, ट्रेजर हंट, डी जे पार्टी, पतंग महोत्सव आणि इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला. अंतिम सामन्यापूर्वी पोलीस बँड पथकाचे संचलन विशेष आकर्षण ठरल्याचे सचिन रायसोनी यांनी सांगितले. अंतिम सामन्याचे बक्षीस वितरण सहप्रयोजक गणेश डाळ आणि बेसन मिल्स चे सतीश, आशिष, अनुप शहा आणि पुना मर्चंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुगळे आणि पोपटलाल ओस्तवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी, त्यांचा परिवार आणि प्रेक्षक उपस्थित होते. सुदर्शन भंडारी, जतिन शहा, कमलेश गोयल, कुणाल ओस्तवाल, मुकेश गोयल आणि सचिन रायसोनी या सहा युवा व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन तीन वर्षांपूर्वी एम एफ सी एल ची स्थापना केली असून त्यांनी अनेक विविध सामाजिक आणि व्यापारी विषयक उपक्रम राबविले जातात.