महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स (Center for Stem and Space Science) तर्फे पी के इंटरनॅशनल स्कूल अॅड जुनिअर कॉलेज, येथे निर्माण करण्यात आलेल्या रोबोटिक्स व स्पेस लॅब चे उदघाटन करण्यात येणार आहे.
हे उदघाटन पी के इंटरनॅशनल स्कुल अँड जुनिअर कॉलेज, पिंपळे सौदागर, येथे २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास, इस्रोचे माजी संचालक व पद्मश्री प्रमोद काळे, माजी वैज्ञानिक इस्रो वि. बी. लाल, माजी वैज्ञानिक, इस्रो सतीश राव, सेंटर फॉर स्टेम अॅड स्पेस सायन्सचे संचालक,हर्षद गेलडा उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान शिक्षण संदर्भात त्याची रुची वाढावी या उददेशाने या सेंटर ची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, रोबोटिक्स, कोडिंग, खगोल विज्ञान या संदर्भात शिक्षण देण्यात येणार आहे.
