2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त, युनिट 4 ने केली कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणाऱ्यांना 2,10,000 रुपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. युनिट 4 ने ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 4 चे सोमनाथ जाधव यांनी याविषयी माहिती दिली. महेश पवार (वय १९ वर्षे रा. खराडी) अजय कसबे (वय 24 वर्षे रा. भीमा कोरेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. युनिट 4 चे पथक विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. खराडी बायपास जवळील दर्गा चौक येथे फाॅरेस्ट पार्क रोडवर दोन व्यक्ती पांढऱ्या रंगाचे गोणीत काहीतरी संशयीत वस्तु घेऊन थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार संजय आढारी व नागेशसिंग कुंवर यांना मिळाली. युनिट ४ कडील पथकाने तात्काळ या ठिकाणी जाऊन दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता व त्यांच्या कब्जातील पांढऱ्या रंगाची गोणी तपासली असता, त्यामध्ये ६ हाईज (४०० वॅट प्रेशर मिड) व एक DP – 4065 डिपी मशीन ऍंम्प्लिफायर असे एकूण किंमत रुपये 2,10,000 च्या साऊंड सिस्टीमच्या वस्तू दोघांनी चोरल्याची कबुली दिली आहे. याबाबत खात्री केली असता चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. संशयीतांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी चंदन नगर पोलीस ठाणे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 4 चे सोमनाथ जाधव, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 4 चे सोमनाथ जाधव, विकास जाधव, पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, हरीश मोरे, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, अमोल वाडकर, शितल शिंदे या पथकाने केली.
