डॉ. राहुल घुले यांचा उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सुरू झालेल्या वन रुपी क्लिनिकचा प्रवास आता महाराष्ट्राबाहेर सुरू झाला आहे.
राममंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर वन रुपी क्लिनिकने- वाराणसीच्या पाच लाख नागरिकांचीमोफत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाराणसीच्या नागरिकांची घरोघरी जाऊन रक्तदाब आणि शुगर तपासणी केली जाणार आहे. अयोध्या, वाराणसी, आणि लखनऊच्या मुख्य जंक्शनवर वन रुपी क्लिनिक्स सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी किमान १० ते १५ कर्मचाऱ्यांचे एक पथक तपासणी करेल. १५ दिवसांत वन रुपी क्लिनिकचे मुख्य संचालक डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन होणार आहे. याआधी बनारस स्थानकात क्लिनिक सुरू करण्यात आले होते. वाराणसीमध्ये जवळपास २५ लाख रुपये लोकसंख्या आहे, तर लखनऊची ३० ते ४० लाख लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेशमध्ये रक्ताची सीबीसी चाचणी किमान ३०० रुपये आहे. शुगर तपासणी १५० रुपये इतकी आहे, असे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.
