पारगाव जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी राजकुमार बालाजी गिराम याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ३० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत राजकुमार गिराम याने हे यश संपादन केले.
राजकुमार हा रूई (ता. वाशी) येथील न्यू छत्रपती शाहू तालीम येथे कुस्तीचे धडे घेत आहे. त्याला या तालमीचे प्रमुख तथा नामांकित मल्ल तात्यासाहेब बहीर आणि कोच दत्ता मेटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुख्याध्यापक दत्तात्रय मोहिते, शिक्षक पी. एल. सानप, सतीश माळी आणि शालेय शिक्षण समितीच्या वतीने त्याचा या यशाबद्दल सत्कार करण्यात आला.
