महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे : कोहिनुर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल यांना आंतरराष्ट्रीय रोटरी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२३-२४ चा हा मानाचा पुरस्कार रोटरी इंटरनॅशनल अध्यक्षांचे प्रतिनिधी मायकेल मॅकगवर्न ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी रोटरी ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व क्रेडाई कुशलचे जे. पी. श्रॉफ उपस्थित होते.
मॅकगवर्न ह्यांनी यावेळी गोयल ह्यांच्या प्रदीर्घ समाजसेवेचा गौरव केला. गोयल यांनी पुरस्काराबद्दल रोटरी इंटरनेशनलचे आभार मानले.
रोटरी सेवा पुरस्कार रोटरीच्या आंतरराष्ट्रीय मूल्ये आणि उद्दिष्टे अमलात आणणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केला जातो. ज्यांनी समुदायांसाठी आणि जगाला चांगले बनवण्यासाठी समर्पित सेवा केली आहे अशा व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
क्रिएट होप इन द वर्ल्ड हे २०२३- २४ ह्या रोटरी वर्षाचे बोधवाक्य आहे. कृष्णकुमार गोयल फाऊंडेशन मार्फत पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात सामाजिक प्रकल्प राबवत आहेत. तसेच पर्यावरण पूरक ‘रोटरी ग्रीन सोसायटी’ प्रकल्प कोहिनुर ग्रुपच्या सर्व प्रकल्पात राबवायचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
