रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी : आचार्य आनंदऋषीजी स्कूल कासारवाडीचा पुढाकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे : रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आचार्य आनंदऋषीजी स्कूल कासारवाडीच्या वतीने दहावीच्या १४५ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अॅपचे मोफत वितरण करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे चार्टर प्रेसिडेंट व भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रो. डाॅ.अशोककुमार पगारिया तसेच आयडियल स्टडी अॅपच्या प्रकल्प समन्वयक वंदना खानविलकर, माजी नगरसेविका आशा धायगुडे, रोटरी क्लब डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष रो.ज्ञानेश्वर विधाटे, माजी अध्यक्ष रो.रामदास जैद, सेक्रेटरी रो.दिपक सोनवणे, आचार्य आनंदऋषीजी स्कूलच्या मुख्याध्यापिका सुलभा मुंगी यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले.
आचार्य आनंदऋषीजी स्कूल, विद्या विकास प्रशाला तसेच ज्ञानराज विद्यालयासह जिजामाता शाळेतील एकूण १४५ विद्यार्थ्यांना हे अॅप मोफत देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व आचार्य आनंदऋषीजी स्कूल यांच्या माध्यमातून प्रा. अशोककुमार पगारिया यांच्या सहयोगातून वितरीत केलेल्या या अॅपमध्ये स्टेट बोर्ड व सेमी इंग्रजी अभ्यासक्रमातील विविध शालोपयोगी घटक समाविष्ट असून शालांत परीक्षेसाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त असून विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करून आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याबाबत अशोककुमार पगारिया यांनी प्रतिपादन केले तसेच या अॅपचा वापर अॅनड्राॅइड मोबाईल वरून किंवा संगणकावर करावयाचा असल्याने विद्यार्थ्यांनी हे अॅप अतिशय काटेकोरपणे वापरणे गरजेचे असल्याचे मत माजी नगरसेविका आशा धायगुडे यांनी सांगितले.
रोटरीचा पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, जल व साक्षरता या क्षेत्रातील कार्य रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांनी विशद केले. शैक्षणिक सुविधा देत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण आपल्या क्षमता ओळखून कष्ट, जिद्दीच्या जोरावरच जीवनात अमुलाग्र बदल करू शकतो व आपली व आपल्या पालकांचा नावलौकिक वाढवत असतानाच आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी अशी भावना रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे माजी अध्यक्ष उद्योजक रामदास जैद यांनी व्यक्त केली. या स्टडी अॅपच्या वापरासंबंधीची सविस्तर माहिती वंदना खानविलकर यांनी दिली.
पार्श्वनाथ मंडळाचे विश्वस्त महावीर कुवाड, रमणलाल कर्नावट, विलासशेठ पगारिया आण्णासाहेब मटाले, डाॅ. संतोष मोरे, डाॅ.योगेश गाडेकर, दत्ता कोल्हे, प्रा.सचिन पवार, रोहित भांबुर्डेकर उपस्थित होते. प्रास्तविक डाॅ.अशोककुमार पगारिया यांनी तर सूत्रसंचालन सचिव दीपक सोनवणे यांनी केले.
