महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल
पारगाव : धाराशीव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते वाशी तालुक्यातील पारगाव आणि रुई येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (दि.२१) करण्यात आले.
खा. ओमराजे यांनी आपल्या खासदार फंडातून पारगाव येथील रुई रोडवरील भवानी मातेच्या मंदिराच्या सभा मंडपासाठी ७ लाख रुपये आणि रुई येथील न्यू छत्रपती शाहू तालीम संघाला १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन खासदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारगाव येथील शिवसेना शाखेचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी पारगाव येथील बहुसंख्य मुस्लिम युवकांनी खा. ओमराजे यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यामध्ये रईस शेख, यासिन पठाण, पाशाभाई शेख, लतिफ पठाण, अनिस पठाण, अंतुल पठाण, सलिम पठाण, पांडुरंग सातपुते, फिरोज शेख, चाँद पठाण, सुभान शेख, असिफ पठाण यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रदीप मेटे, वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे, तालुका संघटक तात्यासाहेब बहीर, उपतालुकाप्रमुख तात्यासाहेब गायकवाड, युवासेना जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश आखाडे, माजी उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्माधिकारी, आनंदराव पाटील, बंडू मुळे, शाखाप्रमुख बालाजी गिराम, दत्ता मेटे, प्रणव बहीर, विजय तळेकर, कानिफनाथ इंगोले, मोहन सुबुगडे, बाबासाहेब गावडे, सतीष कोठावळे, अभय थोरात, प्रतीक कोकणे, अशोक गायकवाड, राहुल शिंदे, उमेश महाडिक, बाळासाहेब सुबुगडे, संभाजी गिराम, तसेच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) महादेव मोटे, अॅड. प्रकाश मोटे, प्रदीप मोटे, नामदेव घाडगे, संपत काटवटे, बाळासाहेब पाटील, पोपट सुरवसे, भगवान गायकवाड, दिपक आखाडे, सुरेश उंदरे आदींसह शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.