महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे:- डिवाईन जैन ग्रुप, काॅसमस ग्रुप पुणे व पुष्पक स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाला बॅरिगेट्स भेट करण्यात आले.
या वेळेस धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी डिवाईन जैन ग्रुपचे अभिनंदन केले व सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन समाजाच्या हितासाठी व पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करावा असे मार्गदर्शन दिले. सरकारी कार्यालय येथे नेहमीच गर्दी असते, म्हणूनच पार्किंग शिस्तासाठी महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 700 लोखंडी बॅरिगेट्स देण्यात येणार आहेत
असे डिवाईन जैन ग्रुपचे अध्यक्ष संकेत शहा यांनी सांगितले. या वेळेस धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक रूपेश गायकवाड, काॅसमस ग्रुपचे मेहुल शहा, डिवाईन जैन ग्रुपचे प्रियांका संकेत शहा, चेतन जैन, भुषण कर्नावट व हर्षल नौलखा उपस्थित होते.