पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते केले वाटप
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
वैराग : पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतचे वैराग पोलीस ठाणे मध्ये गहाळ झालेले अंदाजे 3,92,000 रुपये किमतीचे 28 मोबाईल याचा तांत्रीक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना परत करण्यात आले आहेत.
पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते ते तक्रारदार यांना परत करण्यात आले आहेत. आजपर्यत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यत वैराग पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गहाळ झालेल्या एकूण 58 मोबाईलचा शोध घेतला. त्यातील एकुण 28 मोबाईल अंदाजे किंमत 3,92,000 रुपये यांचा शोध घेऊन 28 तक्रारदारास परत केले आहे. ही कार्यवाही पोलिस अधिक्षक सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षकयावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निवृत्ती मोरे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल भोरे, नागेश नाईकनवरे, स्वप्नील शेरखाने, आकांश कांबळे, सुखदेव सलगर, शरद कांबळे तसेच सायबर पोलीस ठाणेचे रतन जाधव, सचिन राठोड यांनी केली आहे. तक्रारदार यांना विनाविलंब मोबाईल परत केल्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे. या पुढे ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलिस स्टेशन येथे मोबाईलच्या संपूर्ण कागदपत्रासह रीतसर तक्रार नोंदवावी असे आवाहन वैराग पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक निवृती मोरे यांनी केले आहे.
