स्वारगेट पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणा-या चोरटयास जेरबंद करण्यास स्वारगेट पोलिसांनी अटक करण्यात आले आहे.
कार्तीका चव्हाण (वय ३० वर्षे रा. गाडेवस्ती खानापुरता. शेवगाव जि. अहमदनगर) हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडुन २,३०,००० रुपये किंमतीचे ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. फिर्यादी ( वय ५६ वर्षे, रा. मुंबई हे रोजी स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड) येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती.
त्यावरुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन स्वारगेट पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याबाबत तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांना वरिष्ठानी आदेश दिले. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे जाऊन स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरातील सी.सी.टी.व्ही.फुटेज तपासले. मिळालेल्या माहितीच्या आधारे एक संशयीत महिला स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरात दिसुन आली. लागलीच महिला पोलीस अंमलदार खामगळ यांना बोलावुन घेण्यात आले. तिच्या दिशेने जात असतांना ती पळुन जाऊ लागली.
पोलीस स्टाफच्या मदतीने तिचा पाठलाग करुन तिला घेराव घालुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला. तसेच गेले १५ दिवसामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ४ गुन्हे व मोबाईल चोरीचा १ गुन्हा उघडकीस आला आहे.या गुन्हयांमध्ये ३ महिला आरोपी व ३ पुरुष आरोपी यांना अटक करुन त्यांच्याकडुन तपासादरम्यान एकुण ३,६०,००० रुपये किंमतीचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व २,०५,००० रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण १६ स्मार्ट फोन असे मिळुन एकुण ५,६५,००० किंमतीचा मौल्यवान व किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२ स्मर्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, विजय कुंभार, सोमनाथ कांबळे, संदीप मुंढे, तात्या देवकाते, दिपक खेंदाड, संजय मस्के, महिला पो.अं. सुनिता खामगळ यांनी केली आहे.